Uncategorized

पूरग्रस्त भागांची आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व उपनगराध्यक्ष विक्रम साबळे अतिवृष्टी व आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज

खोपोली शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

पूरामुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा त्वरित निचरा करावा, गटारे व नाल्यांची स्वच्छता युद्धपातळीवर करण्यात यावी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश आमदार थोरवे यांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सतर्क राहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली. पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या पाहणी दौऱ्यात खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, महायुती मधील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

“जनतेच्या प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणे, त्यांच्या समस्या तातडीने सोडविणे आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणे ही महायुती मधील नेतृत्वाची बांधिलकी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या कार्यातून सिद्ध होतांना दिसत होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!