बडोद्यात ‘नेचरल वेली’ हॉटेलचा २० एप्रिलला शुभारंभ; आरोग्यदायी खाद्यसंस्कृतीचा नवा पर्याय

बडोदा (प्रतिनिधी) : गुजरातमधील बडोद्यातील भायली परिसरात ए. आर. फूड्सतर्फे ‘नेचरल वेली’ (Nature Velly) या नव्या हॉटेलचा भव्य शुभारंभ २० एप्रिल रोजी होत असून, आरोग्यदायी व चविष्ट खाद्यपदार्थांचा नवा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे रोजगार उद्योग विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उद्योजक अजय तिडके आणि राजेश तिडके यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम साकारत आहे.
भायली येथील वसना-भायली रोडवरील ‘द एम्परर सिन्नोव्ह’ (The Emperor Synnove) इमारतीत, शक्ती ग्रीन पार्टी प्लॉटसमोर, शॉप नं. १८-१९, ग्राउंड फ्लोअर येथे ‘नेचरल वेली’चे भव्य उद्घाटन होणार आहे. शहरातील वाढत्या आरोग्य-जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर निरोगी आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम उभारण्यात आला आहे.
‘नेचरल वेली’ची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे उपलब्ध असलेले सर्व पदार्थ हे गव्हावर आधारित (wheat-based) असून, ते शरीरासाठी पोषक आणि आरोग्यदायी आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोक फास्ट फूडच्या आहारी जात असताना, ‘नेचरल वेली’ ग्राहकांना हेल्दी आणि टेस्टी असा उत्तम पर्याय देणार आहे. तसेच विविध प्रकारचे हेल्दी मॉकटेल्स, पौष्टिक स्नॅक्स आणि संतुलित आहार यांचा समावेश मेनूमध्ये असणार आहे.
उद्योजक अजय तिडके यांनी सांगितले की, “ग्राहकांना चव आणि आरोग्य यांचा उत्कृष्ट समन्वय देणे हा आमचा उद्देश आहे. ‘नेचरल वेली’च्या माध्यमातून आम्ही लोकांच्या आहारात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत.” तर सहमालक राजेश तिडके यांनी नमूद केले की, “या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर आमचा भर राहील.”
दरम्यान, ‘दैनिक बेधडक महाराष्ट्र’ व न्यूज नेटवर्क तसेच परिवारातर्फे अजय तिडके आणि राजेश तिडके यांना या नव्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त करत हा व्यवसाय यशस्वी होवो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बडोद्यातील भायली परिसरात सुरू होणारे ‘नेचरल वेली’ हॉटेल हे आरोग्यदायी, स्वच्छ आणि चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शहरातील खाद्यसंस्कृतीत नवा ट्रेंड निर्माण करत ‘नेचरल वेली’ एक वेगळी ओळख निर्माण करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.




