Uncategorized

जेष्ठ पत्रकार हनुमंत मोरे यांना मातृशोक

(खालापूर – प्रतिनिधी

तालुक्यातील जेष्ठ पत्रकार हनुमंत मोरे यांच्या आईचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी संध्याकाळी पाच वाजता निधन झाले.त्यांच्यावर सोमवारी सकाळी परखंदे शिंदीवाडी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

खालापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार हनुमंत दत्तारामराव मोरे यांच्या मातोश्री श्रीमती सावित्रीबाई दत्तारामराव मोरे यांचे रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.कै.सावित्रिबाई यांनी अत्यंत गरिबीतून आपल्या मुलांना शिक्षण दिले.खूप काबाडकष्ट करून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकला.मुले,सुना, नातवंडे अश्या परिवाराचा गाडा वाढवितांना सर्वांमध्ये एकोपा कसा राहील याची काळजी घेत योग्य कडक शिस्तीने मुलांना शिस्तप्रिय बणविले.त्यांचे चिरंजीव हनुमंत मोरे हे खालापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार असून त्यांना संपूर्ण खालापूर तालुक्यात बेधडक लिखाण करून गोरगरिबांना न्याय हक्कासाठी झगडणारे पत्रकार म्हणून ओळखले जाते.श्रीमती सावित्रीबाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी परखंदे (शिंदीवाडी) येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतल्याचे पहायला मिळाले.श्रीमती सावित्रीबाई दत्तारामराव मोरे यांच्या पश्चात पाच मुलगे, दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!