Uncategorized

रायगड जिल्हा दिशा समिती मध्ये रवींद्र मोरे रुपी मुलुख मैदान तोफ माणगाव तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न व समस्यांवर धडाडली

  बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा २९ मे, २०२६ रोजी अलिबाग येथील नियोजन मंडळाच्या इमारती मध्ये संपन्न झाली. रायगडचे खासदार श्री. श्रीरंग बारणे व श्री. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील सर्व आमदार या समितीचे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी सदस्य सचिव असून जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य आहेत. अनुसूचित जातीचे प्रतिनिधी सदस्य समितीमध्ये माणगाव तालुक्यातील समाज सेवक श्री. रवींद्र मोरे यांची अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीत श्री. रवींद्र मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. रवींद्र मोरे यांनी माणगाव तालुक्यातील विविध सामाजिक समस्या व प्रश्न उपस्थित केले. यामध्ये माणगाव राष्ट्रीय मार्गावरील विविध समस्या मांडल्या. तसेच लोणेरे येथे पल्लवी प्रवीण मोरे हिची निर्घृण हत्या झाली. या हत्याकांडातील आरोपीला रायगड पोलिसांनी अटक केल्याबद्दल त्यांनी रायगड पोलिसांना धन्यवाद दिले. आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा अथवा फाशी व्हावी. पीडित मुलीच्या कुटुंबाला शासनाने सर्व मदत करावी. समाजकल्याण विभागाने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व घरकुल आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली. शासनाने सरकारी वकील श्री. प्रसाद पाटील यांना सरकारी खर्चाने नियुक्ती करावी. अशी मागणी केली.

खांडपाले बौद्धवाडी येथे जाणारा गाडीमार्ग बंद करून हेतुपुरस्कर काही लोक बौद्ध वाडीतील लोकांना त्रास देत आहेत. तेथील दलीत बौद्धसमाज १० वर्ष सनदशीर मार्गाने न्याय मागत आहे. परंतु त्यांना न्याय मिळत नाही. याकरिता बौद्ध समाज ग्रामस्थ ४ मे, २०२६ रोजी माणगाव तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करणार आहेत. त्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये. अशी शासकीय अधिकारी यांनी कारवाई करावी अशी श्री. रवींद्र मोरे यांनी मागणी केली. या बैठकीला गोरेगांव विभागाचे समाजसेवक विकासदादा गायकवाड व नितेश लोखंडे यांनी लेखी निवेदन सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!