Uncategorized

९ ऑगस्टला भरणे येथे मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा भव्य शेतकरी मेळावा; मोफत रोपवाटप व शेतकरी स्नेहभोजनाचे आयोजन

खेड | प्रतिनिधी

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी भरणे (ता. खेड) येथील गणेश मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात शेकडो शेतकऱ्यांना नारळ, आंबा आणि चिकूच्या रोपांचे मोफत वाटप तसेच स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य महेंद्र शांतारामराव भोसले यांनी दिली.

या मेळाव्याच्या नियोजनासाठी २० जुलै रोजी खेड येथील भरणे नाका परिसरातील महेश मोरे यांच्या कार्यालयात मराठा क्रांती स्वराज्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले आणि महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी संघटनेची आगामी दिशा, शेतकरी प्रश्न आणि मेळाव्याच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी महेंद्र भोसले यांनी मेळाव्याची तारीख, स्थळ आणि कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करताना, हा मेळावा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून शेतकऱ्यांना एकत्र आणणारे, शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण घडविणारे आणि त्यांना प्रत्यक्ष लाभ देणारे व्यासपीठ ठरणार असल्याचे सांगितले.

बैठकीस जिल्हा संपर्क प्रमुख महेश मोरे, जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार, तालुकाध्यक्ष श्रीराम कदम, तालुका सचिव दीपक यादव, तालुका संघटक राजेंद्र श्रीपत मोरे, तालुका संपर्क प्रमुख मंगेश पवार, उपतालुकाध्यक्ष अमित जाधव, विभागाध्यक्ष युवराज गुजर, अरविंद कदम, विजय भातोसे, विभाग सचिव भावेश शिंदे, विभागीय संपर्कप्रमुख अनाजी चव्हाण, वडगाव गावप्रमुख राजेंद्र मोरे, सभासद विश्वासराव यादव, युवा पदाधिकारी योगेश कदम, संदेश मोरे, रुपेश कोचरे, तसेच विशाल सागवेकर, श्रीरंग देवरुखकर, संजय चव्हाण यांच्यासह जिल्हा, तालुका व विभागातील अनेक पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत शेतकरी मेळाव्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मेळावा यशस्वी करण्यासाठी गावागावांत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक मार्गदर्शन, रोपवाटप आणि परस्पर संवादाचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!