Uncategorized

ॲड. आनंदराव दौलतराव भोसले व नगरसेवक संजय मोदी यांची सहजीवन शिक्षण संस्था, खेडच्या विश्वस्तपदी बिनविरोध निवड; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

रत्नागिरी

खेड | बेधडक महाराष्ट्र

खेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सहजीवन शिक्षण संस्था, खेडच्या विश्वस्तपदी ॲड. आनंदराव दौलतराव भोसले तसेच नगरसेवक संजय मोदी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून स्वागत होत असून दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहजीवन शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांच्या एकमताने ही निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीसाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विस्तार, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि संस्थेचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी दोन्ही नवनियुक्त विश्वस्तांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला.

ॲड. आनंदराव भोसले यांनी कायदेविषयक आणि सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, तर नगरसेवक संजय मोदी यांनी विकासाभिमुख कामांद्वारे नागरिकांमध्ये निर्माण केलेला विश्वास लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या निवडीनंतर विविध सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी, राजकीय पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि नागरिकांकडून दोन्ही नवनियुक्त विश्वस्तांचे पुष्पगुच्छ देऊन व शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात येत आहे. नव्या जबाबदारीतून संस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि विद्यार्थीहिताचा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!