क्रांती दिनाचे औचित्य साधत शेतकरी मेळावा, मोफत वृक्ष रोपे वाटप – महेशराव मोरे

खेड | बेधडक महाराष्ट्र
क्रांती दिनाचे औचित्य साधत मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा व मोफत वृक्षरोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता खेड येथील गणेश मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण तसेच जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी दिली.
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस तथा बडोदा येथील उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, मुद्रक-प्रकाशक व न्यूज नेटवर्कचे मालक अभिजित दरेकर, राष्ट्रीय रोजगार व उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके तसेच वैद्यकीय विभागाचे राज्याध्यक्ष चंद्रकांत साळुंके यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक शेती, कृषीविषयक मार्गदर्शन, विविध योजनांची माहिती तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, उपस्थित शेतकरी व नागरिकांना मोफत वृक्षरोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
या मेळाव्यास परिसरातील शेतकरी, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण आणि जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी केले आहे.




