संदिप सुर्वे यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खालापूर तालुका प्रवर्तकपदी नियुक्ती

खालापूर : मराठा समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खालापूर तालुका प्रवर्तकपदी श्री. संदिप लक्ष्मण सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदिप मोरे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांच्या मान्यतेने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संदिप सुर्वे हे रायगड जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवचनकार व कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख असून, निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणूनही ते परिचित आहेत. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना ‘गुणिजन गुणगौरव पुरस्कार’ तसेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ आणि सेवाभावी स्वभावामुळे सुर्वे यांच्याकडे समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. समाजातील विविध घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून, सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याची त्यांची कार्यपद्धती आहे.
नियुक्तीपत्रात संघटनेने नमूद केले आहे की, सुर्वे हे समाजासाठी तन-मन-धन अर्पण करून कार्य करीत असल्याची दखल संघटनेने घेतली आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा उपयोग संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी व्हावा, तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार त्यांनी पुढील काळात कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यात मराठा समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी सुर्वे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या




