Uncategorized

प्रसाद वाडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोपोली शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती

खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसाद बबनराव वाडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खोपोली शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
मुद्रे, कर्जत येथील रॉयल गार्डनमध्ये ‘महाएल्गार’ आंदोलनाच्या तयारी बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आणि रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधाकरभाऊ घारे यांच्या मान्यतेने दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसाद वाडकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
खोपोली शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, पक्षाची विचारधारा नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याची जबाबदारी वाडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर प्रसाद वाडकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!