Uncategorized

बिजघर मावळत वाडी येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार निमित्त विक्रांत जाधव यांना निमंत्रण – रमेशराव भोसले

चिपळूण : बेधडक महाराष्ट्र

बिजघर मावळत वाडी येथील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार तसेच श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळ्यानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य माजी अध्यक्ष उद्योजक विक्रांत भास्कर जाधव यांना विशेष निमंत्रण देण्यात आले.

चिपळूण येथे मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेशराव भोसले, माजी पोलीस अधिकारी कृष्णाजीराव भोसले, आरटीओ अधिकारी प्रदीप नरसिंगराव भोसले, माजगाव डॉक येथील निवृत्त अधिकारी अशोक कृष्णाजीराव भोसले आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आमदार भास्करशेठ जाधव तसेच विक्रांत जाधव यांची भेट घेत समाजाच्या वतीने निमंत्रण सुपूर्द केले.

यावेळी बिजघर जिल्हा परिषद शाळा ते मारुती मंदिर या मार्गाच्या डांबरीकरणासाठी आमदार भास्करशेठ जाधव यांनी निधी उपलब्ध करून त्वरित कामाची अंमलबजावणी केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!