Uncategorized

पळसदरी धरणात आर्यन खापर बुडाला? हेल्प फाउंडेशनसह प्रशासनाची युद्धपातळीवर शोधमोहीम

कर्जत प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात आज मंगळवार, २१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली असून, तरुण आर्यन खापर हा पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खारघर येथील भारती विद्यापीठात शिक्षण घेणारा आर्यन खापर हा “लाडकी बहीण” योजनेच्या सरावासाठी आपल्या टीमसोबत पळसदरी गावात आला होता. दुपारच्या वेळेत सराव आटोपल्यानंतर काही युवक पळसदरी धरण परिसरात गेले. यावेळी काही मुले पाण्यात उतरून पोहण्याचा सराव करत होती.

मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा योग्य अंदाज न आल्याने आर्यन अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणातच नजरेआड झाला. ही बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी तात्काळ आर्यनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, कर्जत तालुका पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच “हेल्प फाउंडेशन” (Help Foundation) या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्तेही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सध्या धरण परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून, पाण्यात उतरून आर्यनचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!