अजित दादा पवार यांच्या अंतिमसंस्काराला बारामतीत- भारतीयह्रदयसम्राट सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांची उपस्थिती
बारामती,

दि.29/01/2026 वार गुरूवार रोजी भारतीय नवनिर्माण लहुजी सेना सलग्न,, भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेना,, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीयह्रदयसम्राटसेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांनी मुंबई ते बारामती प्रवास करून , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गटाचे) अध्यक्ष स्व.अजित दादा पवार यांच्या अंतिमसंस्काराला उपस्थित राहून दादाचे अखेर चे दर्शन घेतले आणि त्यांना भारतीय नवनिर्माण लहुजी सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्व.अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना भारतीयह्रदयसम्राट सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांनी मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या ३२ मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सातत्याने दादा कडे निवेदन दिले आणि त्या दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा केला आणि ज्या ज्या वेळी मोतेवाड दादांना भेटायचे त्या त्या वेळी मोतेवाड यांच्या निवेदनाची दखल दादा घ्यायचे या आठवणी मोतेवाड यांच्या कडून व्यक्त केल्या जात आहेत विशेष म्हणजे लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे साहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीयी स्व.अनुष्का किरण पाटोळे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पाटोळे परिवारातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून करून घेऊन संबंधित दोशींना कठोरात कठोर फाशीचीच शिक्षा होण्याबाबत व तसेच सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत किंवा एस आय टी चौकशी करून पाटोळे परिवाराला न्याय द्यावा अशी विनंती दादा कडे मोतेवाड यांनी निवेदनामार्फत केलेली होती हे मोतेवाड यांचे दादा कडे दिलेले अखेर चे निवेदन होते या बद्दल देखील मोतेवाड यांनी अतिशय दुःख व्यक्त केले आहे या अगोदर देखील मोतेवाड यांनी पुर्वीचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजी महाराज नगर येथील एका मातंग समाजाच्या व्यक्तीने मजोरीचे पैसे मागितले म्हणून त्याला अनेक लोकांनी मार मार मारून जिवे ठार केले गेले त्या कोरोना सारख्या महाभयंकर संकट काळात देखील मोतेवाड यांनी दादांना प्रत्यक्ष रित्या मुंबई मंत्रालयात भेट घेऊन सदर विषयासंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि सदर विषयासंदर्भात सविस्तर चर्चा केली व तातडीने कारवाई झाली पाहिजे या करिता एक निवेदन देखील दिले त्याच क्षणी दादानी प्रत्यक्ष रित्या संबंधित विभागाकडे टेलीफोनच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे संपर्क साधून संबंधित दोशींना कठोरात कठोर शिक्षा होण्याबाबत सुचनाही दिल्या आणि तातडीने संबंधित सर्व आरोपी अटक करण्यात आले त्या मुळे मा.पि.एस.मोतेवाड यांनी स्व.अजित दादा पवार यांच्या जाण्याने आज एक प्रामाणिक नेता गमावला आहे असे दुःख व्यक्त केले कारण जेव्हा जेव्हा मोतेवाड आणि दादा मंत्रालयात भेटायचे तेव्हा तेव्हा दादा मोतेवाड यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद देऊन कौतुक करायचे असे मोतेवाड यांच्या कडून दादा च्या आठवणीला देखील उजाळा दिला जात आहे. सदर दुःखद घटनेसंदर्भात मोतेवाड यांनी दुःख व्यक्त करत दादांना भारतीय नवनिर्माण लहुजी सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने व तसेच मोतेवाड परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सदर अंत्यसंस्कार हे दुपारी ठीक 12 वाजुन 12 मिनिटाच्या दरम्यान अग्नी देऊन दादांना अखेरचा निरोप देण्यात आला.




