Uncategorized

युवा समाजसेवक हरेश विलास मोढवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

खालापूर, दिपक जगताप

खालापूर नगर पंचायतच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, जनतेचा विश्वास संपादन करणारे आणि नगराध्यक्ष रोशना मोढवे यांना नगराध्यक्षपदी बसविण्यात मोलाची भूमिका बजावणारे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे हरेश विलास मोढवे यांचा आज वाढदिवस!

आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू कार्यकर्ते, शिवसेना (शिंदे गट) खालापूर शहर समन्वयक म्हणून हरेशभाऊ सतत लोकांसाठी, विशेषतः आदिवासी समाजासाठी कार्यरत आहेत. समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तरुण पिढीला योग्य दिशेने प्रेरित करण्यासाठी ते कायम पुढाकार घेतात. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून त्यांनी खालापूर परिसरातील युवकांमध्ये जागरूकतेची भावना निर्माण केली आहे.

“जनसेवा हीच ईश्वरसेवा” या भूमिकेतून त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. शहरातील विकासाच्या कामात, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांमध्ये आणि शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा वर्ग एकजूट होऊन खालापूरच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!