Uncategorized

मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे ए. व्ही. टेक्निकल सोल्युशनचे मालक अजय तिडके यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

बडोदे : बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधी

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने ए. व्ही. टेक्निकल सोल्युशन या नामांकित औद्योगिक संस्थेचे मालक व उद्योजक अजय तिडके यांना त्यांच्या सामाजिक, औद्योगिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष (सुरत) उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस (बडोदे) उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण तसेच राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष, दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, न्यूज नेटवर्कचे मालक, मुद्रक व प्रकाशक अभिजित दरेकर यांच्या सूचनेनुसार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बडोदे येथे सौ. हिराबेन प्रदीपभाई मोरे यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमात अजय तिडके यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले की, अजय तिडके यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करताना सामाजिक बांधिलकीही जपली आहे. युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगविकासाला चालना देणे तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे यामुळे त्यांची ‘समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

अजय तिडके यांच्या नेतृत्वाखाली ए. व्ही. टेक्निकल सोल्युशनने औद्योगिक क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली असून अनेक नामांकित कंपन्यांसोबत यशस्वी प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर समाजकार्यातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय असल्याने संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरस्कार स्वीकारताना अजय तिडके यांनी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे आभार मानत हा सन्मान समाजसेवा आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!