मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे महेशराव मोरे यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार जाहीर – डॉ. चंद्रकांत मोजाड

खेड : बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे कोकणातील कुशल संघटक व समाजनेते महेशराव शंकरराव मोरे यांना ‘समाज भूषण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष, ज्येष्ठ नेते व उद्योजक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी दिली.
समाजकारण, संघटन कौशल्य आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या महेशराव मोरे यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. कोकण विभागात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना एक सक्षम व विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख मिळाली आहे.
या पुरस्काराबाबत माहिती देताना डॉ. मोजाड यांनी सांगितले की, मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव नारायणराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष अभिजित दरेकर तसेच राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके यांच्या सूचनेनुसार महेशराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, हा पुरस्कार साईबाबा मंदिर साईधाम, बिजघर (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे




