Uncategorized

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पदी सौ. रिद्धी राकेश शिंदे यांची निवड

दिवा (ठाणे) : बेधडक महाराष्ट्र

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पदी सौ. रिद्धी राकेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली असून, संघटनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीसंदर्भात माहिती देताना मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती दळवी यांनी सांगितले की, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष तसेच दैनिक ‘बेधडक महाराष्ट्र’चे संपादक, न्यूज नेटवर्क मालक, मुद्रक व प्रकाशक अभिजित दरेकर, तसेच राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

यासोबतच राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. सौ. संध्या राणे यांनी अधिकृतरित्या सौ. रिद्धी राकेश शिंदे यांच्या निवडीची घोषणा केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सौ. रिद्धी शिंदे यांच्या निवडीमुळे संघटनेच्या महिला विभागाला अधिक बळ मिळणार असून, राज्यभर महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक विस्ताराला चालना मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!