Uncategorized

खेडमध्ये उद्योजकतेचा गौरव! राकेश शिंदे यांना “समाज गौरव “पुरस्कार जाहीर

खेड | बेधडक महाराष्ट्र

ठाणे जवळील दिवा शहर व मंडणगड येथील उद्योजक प्रख्यात विकासक एकविरा देवी कन्स्ट्रक्शन कंपनी

बिल्डर अँड डेव्हलपर्सचे राकेश राजाराम शिंदे शिंदे यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे सन २०२५-२६ या वर्षासाठीचा मानाचा “समाज गौरव ” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शून्यातून स्वतःचे विश्व उभे करणाऱ्या या धाडसी तरुण उद्योजकाच्या यशामुळे मंडणगड तालुक्याच्या नावाला नवा मान मिळाला आहे.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे खेड तालुका संपर्क प्रमुख अरविंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता साईधाम, बिजघर येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राकेश शिंदे यांचा सन्मान करण्यात येणार असून, समाजातील इतर उल्लेखनीय व्यक्तींनाही गौरविण्यात येणार आहे.

मंडणगड व दिवा शहर परिसरात राकेश शिंदे यांनी उभारलेले अनेक बांधकाम प्रकल्प त्यांच्या कामाच्या दर्जाची साक्ष देतात. गुणवत्तापूर्ण बांधकाम, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांप्रती प्रामाणिकता या तत्त्वांवर त्यांनी आपला व्यवसाय उभा केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी विश्वासार्ह विकासक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

या सोहळ्यासाठी रत्नागिरी जिल्हा व खेड तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश शिंदे तालुकाध्यक्ष श्रीराम कदम, तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

“शून्यातून विश्व निर्माण करणारा तरुण” अशी ओळख असलेल्या राकेश शिंदे यांच्या या सन्मानामुळे तरुण पिढीसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे. मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकतेच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष व बिजघर येथील प्रख्यात साईबाबा मंदिर प्रवर्तक सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक मुद्रक प्रकाशक अभिजित दरेकर मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड मुंबई महिला अध्यक्षा सौ आरती बबनराव दळवी , दत्तात्रय झेंडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित कदम आदी सह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!