Uncategorized

मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे शिंग्री तळे विभागातील हरी भक्त राजेंद्र कदम यांना वारकरी आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर- महेशराव मोरे

खेड, (बेधडक महाराष्ट्र) : मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे शिंग्री तळे विभागातील हरीभक्त तसेच सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राजेंद्र सीताराम कदम यांना ‘वारकरी आदर्श व्यक्तिमत्व’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान जाहीर करण्यात आल्याने परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष तसेच ‘दैनिक बेधडक महाराष्ट्र’चे संपादक व न्यूज नेटवर्कचे मालक, मुद्रक-प्रकाशक अभिजित दरेकर, तसेच राष्ट्रीय रोजगार व उद्योग विभागाचे अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. राजेंद्र सीताराम कदम यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरा जपत समाजात आध्यात्मिक विचारांची जागृती केली आहे. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेत उल्लेखनीय कार्य केले आहे.

शिंग्री तळे विभागात हरीभक्त म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र कदम यांनी वारकरी संप्रदायातील मूल्ये जपण्यासोबतच समाजात एकोपा, सद्भावना आणि सेवा भाव रुजवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळाली असून सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत मराठा क्रांती स्वराज्य संघटनेने त्यांना ‘वारकरी आदर्श व्यक्तिमत्व’ पुरस्कारासाठी निवडले आहे. हा पुरस्कार लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, राजेंद्र कदम यांना पुरस्कार जाहीर झाल्याने शिंग्री तळे विभागासह खेड तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा अभिमान व्यक्त केला जात आहे. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!