कर्जत-खालापूरमध्ये ५३९वे भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

कर्जत : सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कर्जत, आवळस व नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-खालापूर तालुक्यातील ५३९वे भव्य रक्तदान शिबीर रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी रविकिरण सभागृह, शनिमहाराज मंदिर, महावीर पेठ, कर्जत येथे उत्साहात पार पडले. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात एकूण ९५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ७६ जणांनी यशस्वी रक्तदान केले, तर १९ जणांना रक्तदाब, हिमोग्लोबिन व इतर वैद्यकीय कारणांमुळे रक्तदान करता आले नाही.
या रक्तदान शिबिराची सुरुवात श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजयजी मांडे, कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, नगरसेविका नेहा शिंदे, सुचिता खोत, कानिटकर, तसेच नगरसेवक महेंद्र चंदन, अमीर मणियार, जयवंत म्हसे, कृष्णा जाधव, डॉ. प्रशांत सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले.
रक्तसंकलनाचे काम नवी मुंबई महानगरपालिका सरकारी रुग्णालय रक्तकेंद्राच्या पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. डॉ. प्रिती संगानी, मिरा गाडेकर, सुभाष खटके, सरिता खेरवासिया, दिपक पोले, अपर्णा जांभळे, महेश सुतार, दिपक पाटील, सना, चंद्रकांत तरखडे आदी आरोग्यसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनिरुद्धबापूंचे स्वयंसेवक शिरीष दिघे, हेमंत सुरावकर, गणेश राऊत, मंगेश गावकर, सुनिल पवार, गणेश घाडगे, विमल डागा, स्वरूपा बदले, मनीषा देशमुख, लता कुलकर्णी, नितीन देशमुख, सुभाष पाटील, राजू गजने, सुरेखा प्रधान, रीना शिंदे, कविता शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
“एकदा रक्तदान, देईल तिघांना जीवनदान” हा संदेश देत समाजातील सर्व घटकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
रायगड भूषण व महारक्तवीर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी सर्व रक्तदाते व सहकाऱ्यांचे आभार मानले.




