Uncategorized

मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे सुनील मोरे यांना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार जाहीर- गुरुनाथ यशवंतराव

पोलादपूर : बेधडक महाराष्ट्र

पोलादपूर तालुक्यातील काटेतली येथील उद्योजक तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल राजमुद्रा चे मालक सुनील तुकाराम मोरे यांना यावर्षीचा मानाचा “राष्ट्रीय समाज गौरव” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा काळेवाडी, पुणे येथील प्रख्यात जोशी वडेवाले हॉटेल चे मालक उद्योजक गुरुनाथ यशवंतराव यांनी ही माहिती दैनिक बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना दिली.

समाजहिताची जपणूक, उद्योजकतेतून रोजगार निर्मिती, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध याची दखल घेत सुनील मोरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून अनेक गरजू नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तसेच दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, न्यूज नेटवर्क मालक, मुद्रक व प्रकाशक अभिजित दरेकर आणि राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे गुरुनाथ यशवंतराव यांनी स्पष्ट केले.

सुनील मोरे यांच्या या निवडीबद्दल पोलादपूर तालुक्यासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!