पुण्याचे पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजी भाकरे यांची सदिच्छा भेट – सदानंदराव भोसले

पुणे : बेधडक महाराष्ट्र
पुण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजी भाकरे यांची त्यांच्या दालनात मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी निवडक सहकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. संदीप भाजी भाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खात्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कर्तव्यदक्ष कार्यशैलीचे कौतुक केले. जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रभावी प्रशासनामुळे त्यांचा विविध स्तरांतून गौरव होत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
या प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे, राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. सौ. संध्याताई राणे, सचिन भूमकर, प्रशांत जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी डॉ. भाकरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व प्रशासकीय कार्याचे अभिनंदन केले.




