Uncategorized

पळसदरी (ता. कर्जत) : बेधडक महाराष्ट्र

बुधवार ५ऑगस्ट २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, पळसदरी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण ८३ विद्यार्थ्यांना दप्तर, छत्र्या, वह्या कंपास, तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालयाचे अध्यक्ष विक्रांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी अभिजीत दरेकर, दत्तात्रय दरेकर, विठ्ठल सुर्वे, संदीप सुर्वे यांच्यासह सेवा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेच्या सौ. वैशाली दौलत ब्राह्मणे, श्री. रोडू दगा गवळी, श्री. अप्पिनाथ पंढरीनाथ थैल आणि श्री. नितेश नारायण दरेकर हे शिक्षक उपस्थित होते. त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!