खेडमध्ये ९ ऑगस्टला मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा भव्य मेळावा; पर्यावरण संवर्धनासाठी मोफत रोपवाटप
"अस्तित्वाचा हुंकार; पर्यावरण संतुलित समृद्धीचा प्रयत्न" – डॉ. चंद्रकांत मोजाड

खेड : बेधडक महाराष्ट्र
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी खेड येथे भव्य शेतकरी व जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नागरिकांना मोफत रोपवाटप करण्यात येणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख संपर्कप्रमुख महेशराव मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “एकच ध्यास, पर्यावरण संतुलित समृद्धीचा विकास” हा संदेश देत संघटना पर्यावरण संरक्षणाची व्यापक जनजागृती करत आहे.
यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष, उद्योजक व विकासक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी सांगितले की, आज मानवाने विकासाची अनेक शिखरे गाठली असली तरी ती निसर्गाच्या किंमतीवर मिळवलेली आहेत. वाढते तापमान, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
“पर्यावरण म्हणजे केवळ झाडे किंवा परिसर नव्हे, तर आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. आपण निसर्गाचे मालक नसून त्याची लेकरे आहोत. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, पाणी आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करता येईल,” असे मत डॉ. मोजाड यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यात शेतकरी, युवक, महिला आणि समाजातील विविध घटकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात येणार असून, मोफत रोपांचे वाटप करून वृक्षलागवडीचा संकल्पही करण्यात येणार आहे. “झाड लावूया, जग वाचवूया” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.
या भव्य मेळाव्यास राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, राष्ट्रीय संपर्कप्रमुख महेशराव मोरे, महाराष्ट्र राज्याध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक अभिजित दरेकर, राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. संध्याताई राणे, राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे, सुरेश कदम गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे, राज्य युवा कार्याध्यक्ष करण पवार, गुजरात राज्य उपाध्यक्ष राम कालगुडे बडोदे जिल्हा उपाध्यक्ष राहुल भोसले खेड तालुका अध्यक्ष श्रीराम कदम, जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती बबनराव दळवी, राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव जिल्हा सरचिटणीस अंकुशराव चाळके, जिल्हा सचिव विवेक कदम, रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार, तालुका सचिव दीपक यादव यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत असून, पर्यावरण संरक्षणाचा हा स्तुत्य उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी व्यक्त केला. ९ ऑगस्ट रोजी खेड येथे होणारा हा मेळावा पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थळ: गणेश मंगल कार्यालय भरणे नाका तालुका खेड ( रत्नागिरी)




