Uncategorized

कर्जत मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती आजाद समाज पार्टीतर्फे उत्साहात साजरी

कर्जत, बेधडक महाराष्ट्र

 

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजाद समाज पार्टीच्या माध्यमातून कर्जत मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहरात ठिकठिकाणी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त बॅनर लावण्यात आले होते. शाहू महाराजांच्या जीवनावर प्रबोधन पर कार्यक्रम तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महिलांसाठी छत्री तसेच सर्वांसाठी मिठाईचे वाटप करण्यात आले. आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट सुमित साबळे तसेच रायगड जिल्हा प्रभारी सिद्धार्थ सदावर्ते साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते, शाहूंच्या जीवनावर व त्यांनी केलेल्या समस्त बहुजनांच्या उद्धारासाठी केलेले कार्य तसेच महिलांसाठी केलेले कार्य आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून विचार मांडण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कर्जत नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पुष्पाताई दगडे, बांधकाम सभापती महेंद्र चंदन, नगरसेविका सुमिता योगेश आप्पा गायकवाड, तसेच माजी नगरसेविका मधुराताई चंदन यांची उपस्थिती होती. प्रबोधनाच्या कार्यक्रमानंतर आलेल्या सर्व विद्यार्थी वर्गास वह्या कंपास पॅड पेन पेन्सिल सेट असे सर्व शालेय वस्तूंचे किट देण्यात आले. आलेल्या सर्व महिला वर्गास सुंदर अशा छत्रीचे वाटप करण्यात आले. सर्वांना मिठाईचे पाकीट देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे आयोजक रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन भालेराव, महासचिव रोहित जाधव , युवक अध्यक्ष सम्यक सदावर्ते, कर्जत तालुका अध्यक्ष प्रशांत जाधव, तालुका सचिव रोहित सरावते, खोपोली शहराध्यक्ष प्रफुल मुंडे तसेच तालुका उपाध्यक्ष किरण ढोले हे होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एक वेळेस मला विसरले तरी चालेल पण राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणासारखी दिवाळी सारखी साजरी करा, म्हणून शाहू महाराजांची जयंती आम्ही एखाद्या सणासारखीच साजरी करणार, शाहू महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी केलेल कार्य तसेच समस्त महिला वर्गासाठी केलेल कार्य तसेच महाराजांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी हक्क अधिकारांसाठी अमलात आणलेली आरक्षणाची संकल्पना जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितली. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी तसेच शेकडो महिला धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते व भीम गर्जना मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!