मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा राष्ट्रीय पारितोषिक वितरण सोहळा शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न
जीवन गौरव, समाजरत्न, उद्योगरत्न, खेलरत्न, विद्या गौरव आणि राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान




खेड : बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे आयोजित राष्ट्रीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. १० मे रोजी साईधाम बिजघर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. या भव्य सोहळ्यास देशभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी दिली.
या वेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावर आयोजित या कार्यक्रमासाठी विविध राज्यांतून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड, राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष व दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक अभिजित दरेकर, मुंबई प्रदेश संघटक गणेश चौधरी, रायगड जिल्हा अध्यक्ष अजय पडवळ, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता आत्माराम साळुंखे, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमात शंकरराव राघोजीराव भोसले, राजेंद्र सीताराम कदम आणि पांडुरंग मोरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच धनंजय शशिकांत दरेकर, विजयराव कदम आणि अजय तिडके यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाड येथील चंद्रकांत साळुंखे यांना मराठा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड आणि खेड येथील यशस्वी उद्योजक संदीप नायकवडी यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिप्ती दिलीप यादव यांना विद्या गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रमोदराव शिवाजीराव भोसले यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच गणेश पंढरीनाथ चौधरी, राकेश शिंदे, आरती बबनराव दळवी, खेड पंचायत समिती उपसभापती सुनील बाबाराम मोरे, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते उत्तमराव भोसले आणि सुनील तुकाराम मोरे यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याशिवाय उत्कृष्ट कार्याबद्दल खेड नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, गुजरात राज्य अध्यक्ष राजुभाई शेवाळे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण, उद्योजक दीपक जाधव, अजित आत्माराम कदम यांना मानाचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार म्हणून रायगडचे दीपक पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास जेष्ठ पत्रकार अश्विनी वडके, धीरजकुमार जैन, सिद्धार्थ पवार, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेशराव भोसले, राजारामराव भोसले, माजी सरपंच यशवंतराव भोसले, उद्योजक संजयराव भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.




