Uncategorized

मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे खेड नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांना “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्कार जाहीर

खेड : बेधडक महाराष्ट्र

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने खेड नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांना “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी दिली. रविवार दि. १० मे रोजी साईधाम, बिजघर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्योजक विजयराव कदम (सुरत), राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे (बडोदा), महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्र चे संपादक, न्यूज नेटवर्क मालक, मुद्रक व प्रकाशक अभिजित दरेकर तसेच राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. माधवी शिवाजी बेलोसे या बेलोसे कुटुंबात जन्माला आल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत दोन भावांना आधार दिला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी लक्ष्मी इंडस्ट्री मध्ये नोकरी करत संघर्षमय जीवन जगले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी आपल्या नृत्यकलेचा ध्यास कायम ठेवत खेडच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आणि “नृत्य विशारद” ही पदवीही प्राप्त केली.

त्यानंतर शिवसेनेचे कोकणातील पहिले तालुकाप्रमुख स्व. सुधाकर मथुर बुटाला यांचे पुत्र राजेश बुटाला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसार, संस्कार आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी घरातील ज्येष्ठांची सेवा केली. श्रवण व ध्रुव यांची आई म्हणूनही त्यांनी आपली भूमिका समर्थपणे निभावली.

रोटरी स्कूलमध्ये नृत्य शिक्षिका म्हणून चार वर्षे सेवा बजावत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या हसतमुख, लाघवी आणि जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आणि २०१६ मध्ये त्यांची शिवसेना महिला आघाडी संघटकपदी निवड झाली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांची मजबूत फळी उभी करत त्यांनी प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली. पूरपरिस्थिती, कोविड काळ यांसारख्या संकटाच्या वेळी त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांना मदत व आधार देत सामाजिक बांधिलकी जपली. बुटाला कुटुंबाने समाजासाठी केलेल्या कार्याची परंपरा आणि त्यांच्या स्वतःच्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली. जनतेनेही त्यांच्यावर विश्वास दाखवत प्रचंड मतांनी त्यांना थेट खेड नगराध्यक्षपदी विजयी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!