Uncategorized

महाड तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकला; निलेश लोखंडे यांचा दणदणीत विजय

महाड, बेधडक महाराष्ट्र

महाड तालुक्यातील सरपंच व सदस्य पदांच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांची मतदान प्रक्रिया दि. २८ एप्रिल २०२६ रोजी शांततेत पार पडली. त्यानंतर आज दि. २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर होताच वराठी ग्रामपंचायतीतील सदस्य पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश लोखंडे यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केला.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार समीर मालगुंनकर आणि निलेश लोखंडे यांच्यात थेट लढत झाली होती. निकाल जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत विजयाचा आनंद व्यक्त केला.

मंत्री भरत गोगावले यांच्या विकासकामांवर ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास तसेच जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली गोमेंडी ग्रामस्थांनी एकनिष्ठपणे शिवसेना शिंदे गटाला विजय मिळवून दिल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.

या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य मन्सूरभाई ताज, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपसभापती सुहेब पाचकर यांनी रात्रंदिवस मेहनत घेत प्रचार यशस्वी केला. तसेच मोहप्रे, ताम्हिणी आणि वराठी ग्रामपंचायत या तिन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

विजयानंतर निलेश लोखंडे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले, विकासशेठ गोगावले, मन्सूरभाई ताज, जितेंद्र सावंत, सुहेबभाई पाचकर, शशिकांत कासारे, युवासेना दासगाव संपर्कप्रमुख काझी तसेच सर्व कार्यकर्ते आणि गोमेंडी ग्रामस्थांचे आभार मानले.

“गोमेंडी ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी विजयी केले आहे. ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवत वराठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांचा अजेंडा कायम ठेवणार,” अशी भावना विजयी उमेदवार निलेश लोखंडे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!