Uncategorized

ऑनलाईन गेमच्या व्यसनातून १५ वर्षीय मुलाकडून चैन स्नॅचिंग; पोयनाड पोलिसांची जलद कारवाई

अलिबाग: बेधडक महाराष्ट्र

अलिबाग : पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत घडलेला जबरी चोरी (चेन स्नॅचिंग) चा गंभीर गुन्हा पोलिसांनी अल्पावधीत उघड करत १५ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात चोरीस गेलेला सुमारे ९० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा लक्ष्मी हारही जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आशा चंद्रकांत पाटील (वय ६५, रा. वाघविरा, ता. अलिबाग) या फुले तोडत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्यावर हल्ला करून गळ्यातील सुमारे ७ ग्रॅम वजनाचा लक्ष्मी हार जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान कुसुंबळे येथील १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले.

सखोल चौकशीत त्याने “91 Club” या ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे पैशांची गरज भासल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या घटनेमुळे ऑनलाईन गेमच्या व्यसनाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. पोलिसांनी पालकांना मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याचे व आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!