Uncategorized

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; महाडचे चंद्रकांत साळुंके यांना “मराठा रत्न” पुरस्कार जाहीर

महाड : दैनिक बेधडक
महाड तालुक्यातील पडवी पठार येथील रहिवासी तसेच मुंबईतील ज.जे. रुग्णालयात तब्बल ३८ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेले श्री. चंद्रकांत साळुंके यांना त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत यंदाचा मानाचा “मराठा रत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
साळुंके यांनी आपल्या सेवाकाळात रुग्णसेवा हीच देवसेवा मानत हजारो रुग्णांना मदत केली. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असताना त्यांनी अनेकांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. विशेषतः १९८३ साली महाड–माझेरी मार्गावरील वरंध येथे झालेल्या भीषण अपघातात त्यांनी रजेवर असतानाही तत्काळ जे.जे. रुग्णालयात हजर होत जखमींच्या उपचारात मोलाची भूमिका बजावली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जखमींना त्यांनी आणि डॉक्टरांनी मिळून नवजीवन दिले.
तसेच पिंपळदरी येथील एका व्यक्तीस कोब्रा सापाने चावल्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. साळुंके यांच्या पुढाकारामुळे त्या रुग्णावर योग्य उपचार होऊन सुमारे १५ दिवसांच्या बेशुद्धीनंतर त्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात यश आले. आजही तो व्यक्ती निरोगी जीवन जगत असून साळुंके यांचे आभार मानतो.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजकार्यात सातत्य ठेवले आहे. गावातील मोडकळीस आलेल्या शाळेचे नूतनीकरण, रस्त्यांच्या कामांसाठी पाठपुरावा तसेच गरजू रुग्णांना मदत या माध्यमातून ते आजही सक्रिय आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे ते परिसरात आदराचे स्थान मिळवून आहेत.
त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत त्यांना “मराठा रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, यामुळे महाड तालुक्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक मुद्रक प्रकाशक अभिजित दरेकर राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला . हा सोहळा साईधाम बिजघर तालुका खेड येथे १० मे रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होणार असल्याचे प्रख्यात साईबाबा मंदिर प्रवर्तक सदानंदराव भोसले यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!