Uncategorized

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालयाकडून तिघर जिल्हा परिषद शाळेला स्पीकर सेट भेट

पळसदरी | बेधडक महाराष्ट्र

समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला सातत्याने सहकार्य करणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, तिघर येथे स्पीकर सेटचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालयामार्फत दरवर्षी विविध शाळांना शैक्षणिक साहित्य, आवश्यक शैक्षणिक साधने तसेच इतर उपयुक्त वस्तूंचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी तिघर येथील जिल्हा परिषद शाळेला स्पीकर सेट भेट देण्यात आला. या संचामुळे शाळेतील प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सण, विविध स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता अशोक खडे, शिक्षक श्री. जनार्धन उमाजी पजई आणि श्री. सदाशिव तात्याबा बांबळे उपस्थित होते. त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालयाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालयाच्या वतीने दत्तात्रय (दादू) दरेकर आणि अभिजीत दरेकर यांनी स्पीकर सेट शाळेकडे सुपूर्द केला. याप्रसंगी संस्थेच्या वतीने भविष्यातही शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अशाच लोकहिताच्या उपक्रमांना सातत्याने चालना देण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष विक्रांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताचे विविध उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करत आहे. या कार्याचे परिसरातील नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!