Uncategorized

खासदार सुरेश (बाल्या मामा) म्हात्रे यांच्याकडून गरजू रुग्णाला आर्थिक मदतीचा हात

शहापूर | रविंद्र दळवी

समाजातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असलेले भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. सुरेश (बाल्या मामा) म्हात्रे यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णाला आर्थिक मदत केली आहे. शहापूर येथील श्री. योगेश पाटील यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी खासदार म्हात्रे यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन पाटील कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे.

श्री. योगेश पाटील यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर सध्या नियमित डायलिसिस सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांना तातडीने किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) करण्याचा सल्ला दिला असून, त्यांच्या वडिलांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या शस्त्रक्रियेसाठी आणि पुढील उपचारांसाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने पाटील कुटुंब गंभीर आर्थिक अडचणीत सापडले होते.

ही बाब खासदार सुरेश (बाल्या मामा) म्हात्रे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत योगेश पाटील यांच्या उपचारांसाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सदर मदत आज श्री. संतोष (भाऊ) शिंदे यांच्या हस्ते श्री. योगेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.

खासदार म्हात्रे यांच्या या मदतीमुळे पाटील कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला असून, पुढील उपचारासाठी आवश्यक निधी उभारण्यासही मदत होणार आहे. त्यांच्या या संवेदनशील कृतीबद्दल पाटील कुटुंबीयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी खासदार म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, श्री. योगेश पाटील यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. संकटात सापडलेल्या एका कुटुंबाला दिलासा देणारी ही मदत समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे उदाहरण ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!