गणेशराजे मोरे यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रवक्तेपदी नियुक्ती

खेड | बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस तथा बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, मुद्रक, प्रकाशक व न्यूज नेटवर्क मालक अभिजित दरेकर तसेच राष्ट्रीय रोजगार व उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके यांच्या मार्गदर्शनानुसार रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी गणेशराजे परबतराव मोरे यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटना कल्याण-डोंबिवली महापालिका प्रवक्ते म्हणून नियुक्ती जाहीर केली.
गणेशराजे मोरे हे सुस्वभावी, सेवाभावी आणि समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. आपल्या संयमी स्वभावामुळे आणि सर्वांना आपलेसे करण्याच्या गुणामुळे त्यांनी सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुशल संघटक, अभ्यासू आणि प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांची ओळख असून संघटनेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढीस लागेल, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संघटन बळकटीकरण, समाजप्रबोधन आणि युवकांना संघटित करण्यासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या नियुक्तीची घोषणा होताच देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गणेशराजे मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. संध्याताई राणे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी, मुंबई प्रदेश संघटक गणेश चौधरी, ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित कदम, राजू माने, प्रा. अर्जुन सांगळे, ॲड. सुधाकर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांचा समावेश आहे.




