Uncategorized

आशिष कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

नवसारी | बेधडक महाराष्ट्र
पोलीस खात्यात कार्यरत असलेले आशिष दिलीपराव कदम यांचे वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक २६ मे २०२६ रोजी लायन इंटरनॅशनल हॉस्पिटल आशापुरी येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आशिष कदम यांच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार असून ते मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांचे भाचे होते. पोलीस खात्यात सेवा बजावत असताना त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, सहकारी व समाजबांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.
आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता गोपालनगर विजलपोर येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पोलीस अधिकारी, समाजबांधव व पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
अंत्ययात्रेनंतर विरावल स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बंधू किरण कदम यांनी भडाग्नी दिला. अंत्यसंस्कार प्रसंगी शेकडो समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!