मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खेड तालुका सहसंपर्क प्रमुखपदी कामगार नेते राजेंद्र चाळके यांची निवड

खेड | बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खेड तालुका सहसंपर्क प्रमुख पदावर ज्येष्ठ कामगार नेते राजेंद्र गणपत चाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य महेंद्र शांतारामराव भोसले यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्याध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, मुद्रक, प्रकाशक आणि न्यूज नेटवर्कचे मालक अभिजीत दरेकर तसेच राष्ट्रीय रोजगार उद्योग विभागाध्यक्ष अजय तिडके यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष, उद्योजक व विकासक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी सांगितले की, राजेंद्र गणपत चाळके हे कोकण रेल्वेमधील ज्येष्ठ कामगार नेते म्हणून परिचित असून नुकतेच सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यासाठी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेत सक्रिय सहभाग घेतला आहे. ते खेड तालुक्यातील सुकीवली गावचे सुपुत्र असून कुशल संघटक आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या नियुक्तीची घोषणा होताच देशभरातील संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे, मुंबई प्रदेश संघटक गणेश चौधरी, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. संध्याताई राणे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे, जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, तालुका अध्यक्ष श्रीराम कदम, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार, तालुका संपर्क प्रमुख मंगेश पवार, तालुका संघटक राजेंद्र मोरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अजित कदम, जिल्हा सरचिटणीस अंकुशराव चाळके, तालुका सचिव दिपक यादव, जिल्हा सचिव विवेक कदम, अरविंद कदम, युवराज गुजर, राज यादव, सुदेश राणे, तालुका उपाध्यक्ष अमित जाधव, विकास यादव, राजेंद्र बा. मोरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.




