मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुका समाज शेतकरी मेळावा न भूतो न भविष्यती संपन्न करणार – महेशराव मोरे
महेशराव मोरे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख

खेड: बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक मुद्रक प्रकाशक अभिजित दरेकर राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त भरणे नाका येथील गणेश मंगळ कार्यालयात होणारा मराठा समाज बांधव शेतकरी मेळावा न भूतो न भविष्यती असा दैदित्यमान भव्य मेळावा संपन्न होईल असा आशावाद रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
या वेळी बोलताना मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले या वेळी शेतकऱ्यांना उपयुक्त नारळ आंबा चिकू रोपांचे वाटप मोफत करण्यात येणार असून संपुर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव शेतकरी उपस्थित राहणार आहेत.या वेळी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खेड पंचायत समिती उपसभापती सुनिलराव मोरे, पंचायत समिती सदस्य महेंद्र शांतारामराव भोसले, शिवसेना उलवे शहर प्रमुख प्रथमशेठ पाटील रॅलिस इंडिया व्यवस्थापक राकेश गोयल, लक्ष्मी ऑरगॅनिक ली.साइट इन्चार्ज दीपकराव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता स्वप्नील पाटील, कृषी अधिकारी रविंद्र माळी, प्रख्यात आपला बाजारचे मालक संदीप वसंत नायकवडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे, राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौ अस्मिता आत्माराम साळुंखे,मुंबई प्रदेश संघटक गणेश चौधरी, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ संध्याताई राणे मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ आरती बबनराव दळवी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार तालुका अध्यक्ष श्रीराम कदम, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार,तालुका संपर्क प्रमुख मंगेश पवार तालुका संघटक राजेंद्र मोरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित कदम, जिल्हा सरचिटणीस अंकुशराव चाळके अरविंद निकम,तालुका सचिव दिपक यादव, जिल्हा सचिव विवेक कदम अरविंद कदम युवराज गुजर , राज यादव, सुदेश राणे तालुका उपाध्यक्ष अमित जाधव , विकास यादव राजेंद्र बा. मोरे यांच्या सह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत . राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांना साजेशा भव्य शेतकरी मेळावा यशस्वी रीत्या पार पाडला जाईल असा विश्वास रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे यांनी व्यक्त केला.




