देवन्हावे ग्रामपंचायत सदस्या अनन्या अखिल साखरे यांचा बाळासाहेब भवन, कर्जत येथे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
कर्जत : बाळासाहेब भवन, कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात देव्हनहावे ग्रामपंचायतीच्या सदस्या अनन्या व अखिल साखरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून एक परिवार आहे. या परिवारात नवीन-जुन्याचा कोणताही भेदभाव केला जात नाही. काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य मान-सन्मान आणि संधी दिली जाते.
ते पुढे म्हणाले की, देवन्हावे ग्रामपंचायत परिसरात अनन्या अखिल साखरे यांनी केलेले लोकाभिमुख कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना महिला आघाडीला आगामी काळात निश्चितच बळ मिळेल. त्यांच्या कार्याचा लाभ पक्ष संघटनेला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात अनन्या अखिल साखरे, अखिल साखरे आणि सर्व शिवसैनिक एकत्रितपणे शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षाही आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली.
या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




