मुंबई प्रदेश मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे अन्नधान्य व मोफत जीवनावश्यक वस्तू वाटप स्तुत्य उपक्रम – सदानंदराव भोसले

मुंबई: बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भाई गुरुदेव दत्तात्रय झेंडे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खार पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या अन्नधान्य व मोफत जीवनावश्यक वस्तू वाटप उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सौ. आरती दळवी आणि भाई गुरुदेव झेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५० गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस तथा बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तसेच दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, मुद्रक, प्रकाशक व न्यूज नेटवर्क मालक अभिजित दरेकर आणि राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे आणि मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना शाखा खार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे मुंबई प्रदेश संघटक गणेश चौधरी यांनी दिली.
यावेळी बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तसेच खार शिवसेना शाखाप्रमुख दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले की, रविवार दि. ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता खार येथील पाली पठार, आंबेडकर रोड येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी गहू, तांदूळ तसेच इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे २५० गरजवंत कुटुंबांना प्रत्येकी अंदाजे २२ किलो वजनाचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी, राज्य उपाध्यक्ष भाई गुरुदेव दत्तात्रय झेंडे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानून त्यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




