खेड तालुका रहिवाशी सेवा संघाचा दिवा येथे रविवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा – प्रकाश चव्हाण

दिवा ठाणे: बेधडक महाराष्ट्र
दिवा ठाणे येथे खेड तालुका रहिवाशी सेवा संघाचा २३ वा. विद्यार्थी गुणगौरव सोहळा मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे खेड तालुका संपर्क प्रमुख प्रतीक शेवरकर यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
या वेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले हा स्तुत्य उपक्रम गेली २३ वर्ष अव्याहतपने सुरू आहे. विद्यार्थी मार्गदर्शन, कला क्रीडा शिबिरे, हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ रणजिता मोरे, मिलींद शिंदे, संतोष जोशी, सचिन कदम, सतीश उतेकर प्रतीक शेवरकर आदी अथक परिश्रम घेत आहेत.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवनीत पाटील, जयसिंग कांबळे, विजय भोईर, सुरेश मोरे, समीर मोरे, गणेश गायकवाड, प्रवीण शिबे,, प्रदीप बेकर, उषा मुंढे, बबन सपकाळ, सौ अनिता पवार, प्रविण उतेकर, श्रीमती सतीश निकम, अमित जाधव, लक्ष्मण जाधव, गणेश दवंडे, गौतम कदम व अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे खेड तालुका संपर्क प्रमुख प्रतीक शेवरकर यांनी सांगितले




