Uncategorized

मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे खेड नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांना “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्कार जाहीर – सदानंदराव भोसले

खेड : बेधडक महाराष्ट्र

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने खेडच्या नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांना “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी दिली.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, मुद्रक, प्रकाशक व न्यूज नेटवर्क मालक अभिजित दरेकर, तसेच राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सूचनेनुसार हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

रविवार दिनांक १० मे रोजी साईधाम, बिजघर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात सौ. माधवी राजेश बुटाला यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याचे सदानंदराव भोसले यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना संघटनेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत असून, सौ. माधवी बुटाला यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!