Uncategorized

रणरागिणी सौ. आरती दळवी यांना ‘समाज गौरव पुरस्कार’ जाहीर; मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा सन्मान

खेड : बेधडक महाराष्ट्र

खार येथील शिवसेना महिला आघाडी शाखाप्रमुख व रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या सौ. आरती बबनराव दळवी यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती संघटनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी दिली.

महेशराव मोरे यांनी सांगितले की, संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, राज्याध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड, तसेच दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक अभिजित दरेकर व राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

याचबरोबर सौ. आरती दळवी यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आहेत.

सौ. आरती दळवी या सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मुंबईतील खार पश्चिम शाखेच्या महिला शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून पक्षात आणि समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महिला प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारी, धाडसी व लढाऊ कार्यकर्ती म्हणून त्यांना “रणरागिणी” ही ओळख मिळाली आहे.

महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती आणि दुर्बल घटकांना मदत या क्षेत्रात त्यांनी सातत्याने काम केले आहे. मुंबईसह कोकण विभागात त्यांचा प्रभावी संपर्क असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही त्या सक्रिय आहेत.

त्यांच्या या निवडीमुळे मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे, जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, तालुका अध्यक्ष श्रीराम कदम, संघटक राजेंद्र मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष अजय पडवळ, ठाणे जिल्हाध्यक्ष अजित कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!