Uncategorized

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त खुटील ते गोमेंढी बौद्ध विकास मंडळ यांचा भव्य दिव्य आखाडा

महाड प्रतिनिधी , निलेश लोखंडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाड तालुक्यात भव्य आणि ऐतिहासिक उत्सव साजरा करण्यात आला. महाड तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध ठिकाणांहून आकर्षक आखाडे काढण्यात आले होते.

यामध्ये खाडीपट्ट्यातील खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ यांचा आखाडा विशेष आकर्षण ठरला. प्रथमच या मंडळाच्या वतीने भव्य, देखणा आणि आकर्षक आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते.

मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या आखाड्याची उत्कृष्ट तयारी करण्यात आली. आखाड्याची सुरुवात रावढल येथून करण्यात आली गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले.

समाधीस्थळी पुष्प अर्पण करून सायंकाळी चार वाजता आखाड्याला सुरुवात झाली. या आखाड्यात लेझीम पथकांची साखळी, आकर्षक देखावे आणि शिस्तबद्ध मिरवणूक यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले.

या कार्यक्रमासाठी बौद्धजन पंचायत समितीचे उपाध्यक्ष सखाराम जाधव, मंडळाचे उपाध्यक्ष नरेश साळवी, कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव, तसेच राजेंद्र पाटणे, अनिल जाधव, माजी अध्यक्ष विजय साळवी, शशिकांत कासारे, विनय खैरे यांसह अनेक पदाधिकारी व सभासदांनी मोठी मेहनत घेतली.

या भव्य आखाड्यात महिला व तरुण वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हा आखाडा रावढल येथून सुरू होऊन महाड शहरात दाखल झाला महाड बाजारपेठ शिवाजी चौक त्यानंतर महाड क्रांती येथे त्याचा समारोप करण्यात आला यावेळी खुटील ते गोमेंडी बौद्ध विकास मंडळाच्या वीस गावातून भीम भीम अनुयायांनी आपला सहभाग नोंदवला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!