कै. अभिषेक हेमंत ननावरे यांचे हृदयविकार झटक्याने दुःखद निधन सर्वत्र हळहळ

मुंबई: बेधडक महाराष्ट्र
अभिषेक हेमंत ननावरे यांचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुखद निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
या वेळी बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले दिनांक १३/४/२०२६ रोजी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना तीव्र झटक्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एक परोपकारी, सर्वांना आपलेसे करनारा होतकरू तरुणाच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबाची सायन येथील निवासस्थानी भेट घेऊन भोसले यांनी परिवाराचे सांत्वन केले मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र कार्यकारी संपादक सदानंदराव भोसले यांनी सांगितले.



