Uncategorized

समरभूमी उंबरखिंडीत ३६५ वा विजयदिन सोहळ्याचे आयोजन..

   २ फेब्रुवारी रोजी छावणी ( चावणी )येथे पार पडणार विजय दिन सोहळा.

खोपोली- बेधडक महाराष्ट्र : ग्रामपंचायत चावणी ग्रामस्थ चावणी आणि जिल्हा परिषद रायगड ,पंचायत समिती खालापूर व शिवदुर्ग मित्र मंडळ यांच्या वतीने समरभूमी उंबरखिंड चावणी येथे 365 व्या विजय दिन सोहळ्याचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले आहे

हा विजय दिन सोहळा सोमवार 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता ( छावणी) चावणी येथे आयोजित करण्यात आला आहे

छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 फेब्रुवारी 1661 गनिमी काव्याचा वापर करत मोजक्या मावळ्यांना घेऊन करतालब खानाच्या मुघल सैन्याचा दारुण पराभव केला होता त्यांच्या या इतिहासाचे स्मरण व्हावे आणि त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा यासाठी येथे दरवर्षी समरभूमी उंबरखिंड येथे विजय दिन सोहळा आयोजित करण्यात येतो

त्याच प्रमाणे यावर्षीही सकाळी विजय स्तंभाला अभिवादन करून मराठमोळा पोवाडा आणि प्रबोधनकार, शिवशाहीर वैभव घरत( पेन खरोशी )यांचा आम्ही मराठी शाहिरी कार्यक्रम होणार आहे तर शिवव्याख्याते अँड विनय चंद्रकांत दाभाडे यांचे शिवव्याख्यान होणार आहे

तरी या विजय दिन सोहळ्याला शिवप्रेमीसह, शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे असे आवाहन चावणी ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब आखाडे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!