शिवसेना शिंदे गटाकडून खानाव पंचायत समितीसाठी रघुनाथ भाई शिंदे यांना उमेदवारी जाहीर..
खानाव पंचायत समिती गणात होणार काटे की टक्कर..

कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर होताच केला आनंदोत्सव साजरा..
खालापूर / दिपक जगताप
खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे निवडणूक बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. यामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात शिवसेना शिंदे गट आघाडीवर दिसून येत असून योग्य उमेदवार यांची चाचपणी करून एक एक उमेदवार जाहीर करत आहेत.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार लढणार असून सर्व निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने निवडणुका लढा असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे
यावेळी आज खालापूर येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा माजी तालुका प्रमुख रघुनाथ भाई शिंदे यांची खानाव पंचायत समिती सदस्य निवडणूक उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आजच आनंदोत्सव साजरा केला असून ही निवडणूक आम्ही जिंकणार ही घोषणा केली आहे.
भाई शिंदे जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष म्हणून करत असताना रायगड जिल्ह्यात करोडो रुपयांच्या निधी खर्च करून अनेक विकास कामे केलेल्याचा अनुभव असून माजी तालुका प्रमुख म्हणून त्यांनी जवळपास 15वर्षे काम केलेले आहे. ह्याचा नक्कीच फायदा निवडणुकीत भाई शिंदेंना होणार असा ठाम विश्वास शिवसैनिक करत आहेत. भाई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने खानाव पंचायत समिती निवडणुकीत काटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
“भाई शिंदे यांना प्रशासनाचा अनुभव असल्या कारणाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आज भाईंना उमेदवारी जाहीर केली आहे. आम्ही सर्व शिवसैनिक एकसंघ राहून कोणत्याही परिस्थितीत ह्या निवडणुकीत भाई शिंदे यांना निवडून आणू.”




