शिवसाई.कंन्सट्रक्शन करत आहे बोगस कामाचा खेळ
मात्र अभियंता यांच या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष आणि कोणताही दिसत नाही मेळ

छत्रपती संभाजीनगर न्यूज नेटवर्क जब्बार तडवी
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये रोड च्या व पुलांच्या कामांमध्ये शिवसाई कन्स्ट्रक्शन निकृष्ट दर्जाच्या बोगस कामांचा तांडव माजवत आहे मात्र प्रशासनाचे अधिकारी अभियंता घरी झोपा घेत आहे का? असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेला आहे. कारण शिवसाई कन्स्ट्रक्शन चा मालक सर्रासपणे निकृष्ट दर्जाचे बोगस काम करीत असल्यामुळे शेतकरी ग्रामस्थ यांच्यामध्ये मोठी नाराजी व संताप दिसून येत आहे. असाच धक्कादायक प्रकार सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा ते चारू तांडा रोडचे काम सुरू आहे या कामावरती निकृष्ट दर्जाची सामग्री वापरली जात आहे तसेच या कामाच्या निकषानुसार या रोडवरती पाणी मारुन रोलर दाबाई केली जात नाही मात्र थातूरमातूर रोलर फिरवून पळ काढण्यात येत आहे त्यामुळे या रोडवरती पूर्ण गिट्टी उघडी पडलेली असून या रोडने प्रवास करणाऱ्या प्रवासी व नागरिकांना आणि पाळीव गुरे जनावरे पशु यांच्या पायाला ती गिट्टी रुतल्यामुळे मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी दिली. तसेच रोड बनवताना बाजूचे साईट पट्टे ड्रम आल्या अभियंता व शिवसाई कन्स्ट्रक्शन चे मालक यांनी काढलेल्या नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमीन चिभडून शेताचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच चारू मूर्ती अनाड शिवार परिसरामध्ये अभियंता व शिव साई कन्स्ट्रक्शन चे मालक यांनी वन विभाग तसेच तहसील महसूल विभाग यांची कोणतिही परवानगी न घेता कायद्याचे उल्लंघन करून सर्रासपणे अवैधरित्या सागवान,लिंब व इतर प्रजातीच्या झाडांची पोकलँड च्या साह्याने अवैध कत्तल करून हा पराक्रम केलेला आहे या प्रकरणी अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी संतोष दोडके यांना या संदर्भामध्ये माहिती मिळताच त्यांनी सावळदबारा वन परिमंडळ चे वनपाल टी. झेड. खतीब ) आणि वनरक्षक मोरे यांना कारवाई संदर्भात आदेश दिले असता त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या प्रकाराची शहानिशा करून कत्तल झालेल्या वृक्षांचा पंचनामा करून प्रकरण दाखल केलेले आहे अशी माहिती समोर आलेली आहे व पुढील दंडात्मक कारवाई साठी अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वन क्षेत्रपाल अधिकारी संतोष दोडके हे या शिवसाई कन्स्ट्रक्शन चे मालक तसेच या कामाचे अभियंता, उप अभियंता, सुपरवायझर आणि पोकलँड चालक-मालक या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरती कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या हुकूमशाहीचे तांडव माजवणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींकडे शासनाचे व वरिष्ठ अधिकारी प्रशासन यांचेही पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. याच शिवसाई कन्स्ट्रक्शन ने नांदा तांडा व नांदगाव या रोडवरती मागील वर्षी पुलाचे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे बोगस मटरेल वापरून पुलाचे बोगस काम करून तीन तेरा वाजविले होते. हा गंभीर प्रकार नांदा गावचे ग्रामस्थ यांच्या लक्षात येताच यांनी हे काम काही दिवसांसाठी अडविले होते. व या कामाचे ठेकेदार अभियंता यांना असे सांगितले होते. कि तात्काळ हे बोगस काम थांबवून चांगल्या पद्धतीने हे काम करण्यात यावे परंतु या कामाचे ठेकेदार व अभियंता यांनी मन मर्जीने केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तोच प्रकार आता या रोडवरती सुरू आहे. या रोडच्या कामाचा कालावधी संपलेला असून हे काम खूप संत हळू गतीने सुरू असल्यामुळे अनेक दिवसांपासून हे काम रखडलेले आहे. या रोडचे काम कधी पूर्ण होणार हा ही एक मोठा बेजबाबदार पण समोर आलेला आहे




