Uncategorized

भाजप युवा नेते विक्रम साबळेंचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमांची रेलचेल; वारकऱ्यांचा सत्कार

खोपोली भाजपचे युवा नेते विक्रम यशवंत साबळे यांनी आपला वाढदिवस यंदा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साजरा केला. शहरातील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, या प्रसंगी वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांचा सन्मान करून विक्रम साबळे यांनी एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला.

विक्रम साबळे हे खोपोलीतील जेष्ठ भाजप नेते यशवंत लक्ष्मण साबळे यांचे सुपुत्र असून, साबळे कुटुंब समाजसेवा आणि जनकल्याणाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर आहे. विक्रम यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात असा उपक्रम आयोजित केला, जो आजवर कोणी केला नव्हता. या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, रक्तदान मोहिम तसेच वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळी कार्यक्रमाची सुरुवात मोफत आरोग्य तपासणी शिबिराने झाली. विविध तज्ञ डॉक्टर्सनी नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक सल्ले दिले. रक्तदान शिबिरात युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “आरोग्यदायी समाजासाठी रक्तदान अत्यावश्यक आहे,” असे मत विक्रम साबळे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “माझा वाढदिवस साजरा करण्याचा हेतू केवळ शुभेच्छा घेणे नसून, समाजासाठी काहीतरी उपयोगी कार्य घडवणे हा आहे.”

या प्रसंगी वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांचा सन्मान हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. भजन, कीर्तन आणि संत परंपरेच्या माध्यमातून समाजात चांगले संस्कार जपणाऱ्या या मंडळांना मानाचा शेला, टाळ-वाद्य भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. वारकऱ्यांच्या सन्मानाने कार्यक्रमात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.

या सन्मान सोहळ्यावेळी रायगड भूषण ह. भ. प. रामदास पाटील यांनी विक्रम साबळे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, “आजच्या तरुण पिढीमध्ये वाढदिवस म्हणजे धिंगाणा, पार्टी आणि दिखावा. पण विक्रम साबळे यांनी भजनी मंडळांचा सन्मान करून आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमातून समाजात सकारात्मक विचारांची बीजं पेरली जात आहेत.”

विक्रम साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपसह विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, काशीनाथ पारठे, तसेच पक्षाचे जेष्ठ सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, डॉ. सुनील पाटील, भाजप शहराध्यक्ष मनीष यादव, माजी नगरसेवक मंगेश दळवी, रमेश जाधव, शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन औसरमल, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपशहरप्रमुख दिनेश थोरवे, युवासेना शहराध्यक्ष संतोष मालकर, गणेश खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळपासूनच नागरिक आणि कार्यकर्त्यांनी साबळे यांना भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. विविध सामाजिक संस्थांनी त्यांना सत्कारपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

विक्रम साबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने काहीतरी योगदान द्यावे. आपला वाढदिवसही जर समाजोपयोगी बनवला, तर त्याचा खरा आनंद मिळतो.” त्यांनी सांगितले की, पुढील काळातही आरोग्य शिबिर, रक्तदान, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणविषयक अनेक उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी भजनी मंडळांनी अभंग गायन सादर केले. वातावरणात भक्तीभाव पसरला आणि वाढदिवसाचा सोहळा सामाजिकतेसोबत अध्यात्मिकतेने उजळून निघाला.

खोपोली शहरातील नागरिकांनी विक्रम साबळे यांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या या आदर्श उपक्रमामुळे सामाजिक कार्याला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!