शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष


रायगड : शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्रीतम शेठ धारिया यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पवडमल, जिल्हा महिला अध्यक्षा ॲड. अंजली बानापुरे, तसेच निलेश लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रीतम शेठ धारिया यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
केक कापून, शुभेच्छा देत आणि जल्लोष करत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांना दीर्घायुष्य व भावी सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आज शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रमुख श्री प्रितम शेट धारिया साहेब ह्यांचा वाढदिवस पुणे येथे साजरा करताना रायगड चे पधादिकारी..




