Uncategorized

पोलिस बांधवांसोबत ताराराणी ब्रिगेडचा रक्षाबंधन उत्साहात

खोपोली : राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदना ताई मोरे, ताराराणी ब्रिगेड यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्यात पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा संदेश दिला.
समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतात. अनेकदा सण-उत्सवाच्या काळातही त्यांना कर्तव्यावर राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या योगदानाची दखल घेत ताराराणी ब्रिगेडच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर खालापूर तालुका पोलीस ठाण्यातही वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या महिलांनी पोलिस बांधवांना राखी बांधत बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि परस्पर संरक्षणाची भावना जपण्याचा प्रयत्न केला.
रक्षाबंधन हा केवळ भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचा संकल्प करणारा सण नसून, समाजातील परस्पर स्नेह, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना दृढ करणारा सण आहे. पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांच्या कर्तव्याला आणि समाजसेवेला सलाम करण्याचा प्रयत्न ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात आला.
या उपक्रमात ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदना ताई मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवमती कविता ताई खोपकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किशोरी चेऊलकर , खोपोली शहर अध्यक्षा वर्षा वडजे, भारती शहा, सुनंदा कोहक आणि दीक्षा राणे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!