कर्जत ५४३ वे भव्य रक्तदान शिबिर – २६ जुलैला कपालेश्वर मंदिरात आयोजन

कर्जत/बेधडक महाराष्ट्र
सामाजिक बांधिलकी जपत *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कपालेश्वर देवस्थान समिती आणि शिवतांडव प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज पथक, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने ५४३ वे रक्तदान शिबिरआयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे नियोजन रायगड भूषण, महारक्तवीर राजाभाऊ कोठारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कपालेश्वर मंदिर, टिळक चौक, कर्जत येथे होणार आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी संकलित होणारे रक्त हे विशेषतः थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. थॅलेसेमिया रुग्णांना दर १५ दिवसांनी रक्ताची गरज असते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी पुढे येऊन सामाजिक, राष्ट्रीय आणि मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकदा रक्तदान।
देईल तिघांना जिवनदान ॥
वासरूनी जाती धर्म सारे ।
रक्तदान करूनिया एक होऊ यारे ॥
कर्जत-खालापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना आणि रक्तदात्यांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




