इलेव्हन स्टार संघाचे खेळाडू गिरीष सुर्वे यांचे निधन – कर्जत 40+/50+ क्रिकेट वर्तुळात शोककळा

कर्जत / कर्जतच्या क्रिकेट वर्तुळातील परिचित नाव आणि इलेव्हन स्टार क्रिकेट संघाचे सक्रिय सदस्य गिरीष सुर्वे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारासह संपूर्ण कर्जत 40+/50+ संघटनेवर शोककळा पसरली आहे.
गिरीष हे अत्यंत मित्रवत, मदत करणारे आणि संघटना कौशल्य असणारे व्यक्तिमत्व होते. बालपणापासून इलेव्हन स्टार संघाच्या निमित्ताने बनले त्यांचे मैत्रीचे नाते आजतागायत टिकून होते. नेहमी हसत-खेळत, टिंगल-टवाळी करत मैत्रीच्या मैफिलीला जीवंत ठेवणारे गिरीष सर्वांचे लाडके होते.
मागील वर्षी मोठे ऑपरेशन होऊनही त्यांनी नव्या उमेदीने पुन्हा मैदानावर पुनरागमन केले होते. याच वर्षी झालेल्या 40+ स्पर्धेदरम्यान बामचा मळा ग्राउंडवर त्यांनी भावूक होऊन सांगितले होते की “आपला पुनर्जन्म झाला आहे तो केवळ मित्रांमुळे”. क्रिकेट प्रती असणारे त्यांचे समर्पण आणि आकलन सर्वांसाठी प्रेरणादायी होते.
गिरीष केवळ चांगले खेळाडूच नव्हते तर तळागाळातील लोकांना मदत करणारे, कोणत्याही प्रसंगी वेळी-अवेळी धावून जाणारे सामाजिक व्यक्तिमत्व होते.
त्यांच्या जाण्याने इलेव्हन स्टार संघातील सर्व मित्रांना आणि कर्जत 40+ /50 + संघटनेतील सदस्यांना एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि दुःखी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना. दै.बेधडक महाराष्ट्र कङून देखील अशा व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली……




